खरीप २०२४ च्या पिकांचे पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी

0
34

चोपड्यात शेतकरी कृती समितीतर्फे तहसिलदारांना निवेदन सादर

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

खरीप हंगामात तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील खरीप २०२४ च्या पिकांचे पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकरी कृती समितीची मागणी असून अशा आशयाचे निवेदन त्यांनी चोपडा तहसीलदार यांना नुकतेच सादर केलेले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ओला दुष्काळाचे ट्रिगर काहीही असले तरी नुकसान मात्र साऱ्याच आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्यात वेळ न घालता, गरज असल्यास प्रातिनिधिक पंचनामा करून लवकर निर्णय घेवून नुकसान भरपाई मंजूर करून उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही निवेदनात केली आहे. यासाठी लवकर निर्णय न झाल्यास शेतकरी मोठे आंदोलनही उभारतील, असेही निवेदनात नमूद केले आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की, उर्वरित सर्व मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७ वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी बसली नाही. बऱ्याच वेळेस दुपार नंतरचे चोवीस तासात ६५ मी.मी.पाऊस पडतो.तो दोन वेगळ्या दिवसात मोजला गेल्याने अतिवृष्टी कागदावर दिसत नाही.अशी अतिवृष्टी दोन तीन वेळेस झाली. त्यानंतर सततच्या पावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.

जे थोडे फार उत्पादन येण्यासारखे दिसत होते ते गेल्या तीन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासकट आलेल्या पावसाने हिरावले. त्यात सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही किंवा ज्यांनी काढला, त्यांची ७२ तासात तक्रार नोंदणी झाली असेलच असे नाही. पण नुकसान सर्वांचेच झाले आहे. अती वेगाने पर्जन्यवृष्टीमुळे कापसाची फुल फुगडी पूर्ण गळून गेली.थोडेफार जे पक्व आहेत. त्यात बोंडअळीने या ढगाळ वातावरणामुळे नुकसान सुरू झाले आहे. ही वास्तवता तालुक्यात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

यांच्या आहेत निवेदनावर स्वाक्षऱ्या

निवेदन सादर करताना एस.बी.पाटील (नाना), प्रा. प्रदीप पाटील, अजित पाटील, कुलदिपसिंग पाटील, प्रफ्फुलसिंग राजपूत, डॉ.सुभाष देसाई, समाधान पाटील, सुभाष पाटील, प्रा. छबिलाल सोनवणे, समाधान पाटील, महेंद्र बोरसे, सतीश पाटील, किशोर पाटील, सुनील पाटील, रवींद्र सोनवणे, शिवाजी पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here