पहुरच्या शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत यश, पाच खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही. एस.नाईक महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत पहुर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा तायक्वांदो पटुंनी सहभाग घेऊन तीन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य तर एक कांस्य पदक प्राप्त केले आहे.
शेंदुर्णी येथील आ. र .भा.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गौरी विजय कुमावत, लोचना श्रीकृष्ण चौधरी, साहील बेग यांनी सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली तर दिनेश वासुदेव राऊत याने रौप्य पदक तर हर्षल संतोष उदमले याने कांस्य पदक पटकाविले. जामनेर येथील सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेणारा भूषण मगरे याने रौप्य पदक प्राप्त केले आहे.
२० आॅक्टोंबर रोजी रावेर येथील व्ही. एस.नाईक महाविद्यालय याठिकाणी होणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सुवर्ण तर रौप्य प्राप्त खेळाडूंची निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना तायक्वांदोचे प्रशिक्षक हरीभाऊ राऊत, प्रा. डॉ.महेश पाटील, प्रा.पियूष महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे यांनी केले कौतुक
यशस्वी खेळाडूंचे शेंदुर्णी येथील दि शेंदुर्णी सेकंडरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन संजय गरुड, प्राचार्य डॉ.एस.डब्ल्यू.भोळे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धारीवाल, प्राचार्य डॉ.शशिकांत बऱ्हाटे, जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, शौर्य स्पोर्ट अकॅडमीचे उपाध्यक्ष बाबुराव घोंगडे, ॲड. संजय पाटील, श्रीकृष्ण चौधरी, ईश्वर क्षीरसागर यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी कौतुक केले आहे.
