साईमत, प्रतिनिधी, जळगाव
इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने व मिल्लत फाउंडेशन फॉर एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बंगळूर यांच्या सौजन्याने शनिवार ‘होलिस्टिक डेव्हलपमेंट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथील बीडीएस डॉ. डॉ. अब्दुल रहीम शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रफिक पटवे यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली. डॉ.चांद खान, डॉ.इरफान शेख, इफ्तिखार अहमद व आरिफ शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते सय्यद अजहर साहेब (मुंबई) यांनी होलिस्टिक डेव्हलपमेंट आणि कॅरेक्टर बिल्डिंग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर मो. अमीन शेख यांनी हॉलिस्टिक डेव्हलपमेंट मध्ये संस्था, महाविद्यालय व शिक्षक यांच्या भूमिकेबद्दल चर्चा केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सालार यांनी होलिस्टिक डेव्हलपमेंटचे महत्त्व आणि त्यासाठीचे आवश्यक प्रयत्न याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सचिव एजाज मलिक, सदस्य अब्दुल अजीज सालार, अब्दुल वहाब मलिक, जाहिद शाह यांच्यासह मा. रफिक शाह, अब्दुल कय्युम शाह, मुश्ताक करीमी भुसावळ येथील हाजी अन्सार अहमद, सलाहुद्दीन अदीब, यावल येथील रहीम रजा आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. हारून बशीर यांनी केले.