ज्ञान, कर्म, भक्तीचा विवेकाने वापर करुन पंढरपुरला प्रवेश करावा

0
17

साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर :

वारकरी संप्रदायात ज्ञान, कर्म व भक्ती ही साधनेची द्वारे आहेत. ती व्यापक आहे. त्याचा विवेकाने वापर करून पंढरपूरमध्ये प्रवेश करावा, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे थोर विचारवंत चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. पंढरपूर येथील डिंगम्बर महाराज मठाचे भव्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा चैतन्य महाराज आणि ॲड.जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते सोमवारी, १५ जुलै रोजी झाला. अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते.

भरकटणारी व्यसनाकडे जाणारी युवक पिढी कायद्याने बदलणार नाही तर त्या आध्यात्मिक संस्काराने बदलतील. त्यासाठी तरुणांसाठी ज्ञानेश्वरीचे विचार व ज्ञान प्रसार करण्यासाठी त्यातील संस्कार युवकांना रुजविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. यावेळी ॲड. जयवंत बोधले यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रवेशद्वाराचे आध्यात्मिक महत्व विषद करून सर्व वक्त्यांनी डिंगम्बर महाराज मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, सहकारी व विश्वस्थ मंडळाने खूप मोठे भक्तनिवास व भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आल्यामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या वैभवात भर पडली आहे. या कार्यासाठी मंडळाचे अभिनंदन करून कार्याचे कौतुक केले.

यांची होती उपस्थिती

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश महाराज जवंजाळ, विठ्ठल मंदिर पंढरपूरचे समिती सदस्य, भरत महाराज पाटील, धनराज महाराज, दुर्गादास महाराज, सारंगधर महाराज, सुधाकर महाराज, रमेश महाराज आडविहिकर, कन्हैया महाराज राजपूत, विशाल महाराज खोले, नितीन महाराज, रमाकांत भारंबे ही सर्व परंपरा प्रमुख उपस्थित होते.

यांनी केले संत पूजन

संत पूजन उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, सदस्य सुनील भंगाळे, धनंजय चौधरी, अतुल तळले, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, नितीन चौधरी, हिरालाल चौधरी, धनु फिरके यांनी केले. सोहळ्याला ललिता महाजन, सुमन राणे, शंकुतला पाटील, रवींद्रभैय्या पाटील, निलेश राणे, रमेश भंगाळे, जनार्दन भारंबे, नरेंद्र चौधरी, हिरेंद्र चौधरी, अशोक महाजन, प्रल्हाद महाजन, यांच्यासह यावल, रावेर तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी शेखर चौधरी, भूषण नारखेडे, मुकुंद भंगाळे, मुकेश पाटील, भास्कर बोंडे, सागर चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेची निर्मिती, कामकाज, आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेशद्वारचे महत्व संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here