संतचरण, प्रभू स्मरणानेच मोक्षप्राप्ती साधून घ्यावी

0
38

संगीतमय श्रीराम कथेच्या कथासमाप्तीप्रसंगी हनुमानदासजी महाराज यांचे आशीर्वादपर वचन

साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर :

जगाच्या कल्याण संतांच्या विभूती उक्तीप्रमाणे विश्वात सुख, शांती, समाधान, आनंद आणि भरभराट निर्माण करण्यासाठीच साधू, संत, महंत यांचे जीवन आहे. संत आणि प्रभू सेवेत समर्पित मानवाला जीवनातील परमोच्च सुखाची अनुभूती मिळते. म्हणून या जन्मात प्रत्येक मानवाने संतचरण आणि प्रभूस्मरण यातून मोक्षप्राप्ती साधून घ्यावी, असे आशीर्वादपर वचन मध्य प्रदेशमधील अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री प.पू. हनुमानदासजी महाराज यांनी व्यक्त केले. ते फैजपूर येथील श्री खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व साकेतवासी ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून संगीतमय श्रीराम कथेच्या कथासमाप्ती व संतदर्शन सभेत बोलत होते.

व्यासपीठावर पूज्य महामंडलेश्वर मनमोहनदासजी उर्फ राधेराधे बाबा इंदोर, महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज सतपंथरत्न गादीपती सतपंथ संस्थान फैजपूर, अनिलानंदजी महाराज अखिल भारतीय संत समिती प्रवक्ता मध्य प्रदेश भोपाळ, कृष्णदासजी महाराज नांदेड, स्वरूपानंदजी महाराज श्रीक्षेत्र डोंगरदे, पवनदासजी महाराज, हरिदासजी महाराज, मीरा दीदी, शास्त्री अनंतप्रकाश दासजी, भक्तीस्वरूप दासजी, कृष्णगिरीजी महाराज, सोमवार गढी सावदा, श्रीराम कथावाचक श्री राघवजी महाराज आयोध्याजी, विजयदासजी महाराज, महावीरदासजी महाराज, सिहोर मंडळ भोपाळ, राघवेंद्र दासजी, हरिदास महाराज इच्छापूर, भरत महाराज, हनुमानदासजी महाराज, दुर्गादासजी महाराज खिर्डी, स्वामी प्रकाशदास जी, प्रवीणदासजी महाराज, कन्हैया प्रभुदासजी, उद्धवानंदगिरीजी महाराज, ज्ञानविष्णुदासजी राम जानकी मंदिर बीदिसा, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास जी महाराज गादीपती श्री खंडोबा वाडी देवस्थान, पवनकुमारदासजी उत्तराधिकारी श्री खंडोबा वाडी देवस्थान, श्री राममनोहरदास, पुजारी जी आदी साधू, संत महंत यांच्यासहित नरेंद्र नारखेडे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, केतकी पाटील, शरद महाजन, धनंजय चौधरी, सिमरन वानखेडे, आदी मान्यवर व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संतवाणी व आशीर्वादपर मनोगत दिव्यचैतन्य महाराज पाल आश्रम, कन्हैया प्रभुदास इस्कॉन मंदिर फैजपूर, दुर्गादास महाराज, दत्तात्रय महाराज, भरत महाराज म्हैसवाडी, श्याम चैतन्य महाराज जामनेर, प्रवीणदासजी महाराज, पवनदास महाराज, हरिदास महाराज, मीरादिदी प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय, नरेंद्र नारखेडे, धनंजय चौधरी, डॉ उल्हास पाटील, शरद महाजन यांच्यासहित महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज, पूज्य राधेराधे बाबा आदी संत महंतांनी उपस्थित भक्त जणांना मार्गदर्शन केले.

अखंड पुण्यतिथी साजरा करण्याचा योग

यावेळी महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी महंत घनश्याम दासजी यांची आठवण करीत ब्रह्मचारी आत्मानंद जी महाराज व गुरू कृपेने गेल्या सहा वर्षापासून अखंड पुण्यतिथी साजरा करण्याचा योग येत आहे. यासोबत श्री खंडोबा वाडीत नियमित सत्संग, संत सेवा, प्रभू सेवा, गोसेवा यासोबत विविध अध्यात्मिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. गुरूकडून मिळालेला वारसा पुढील पीढीत हस्तांतरित करताना अत्यंत होत असल्याचे नमूद करीत उत्तराधिकारी पवनकुमारदासजी यांच्या व्यवस्थापनाखाली आयोजित श्रीराम कथेचे यशस्वी आयोजन बघून आनंद व अभिमान व्यक्त केला. यापुढेही पंचक्रोशीतील भक्तगणांसाठी असे आयोजने केली जातील, असे सांगितले.

मानवाने शक्य तेवढे नामस्मरण करावे

महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी साधु, संत यांच्यावर सामान्य माणसांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला, श्रद्धेला कुठेही तळा जाऊ देऊन नये तडा जाईल, असे वर्तन घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत प्रत्येक मानवाने शक्य तेवढे नामस्मरण, तपश्चर्या करून भगवंतप्राप्ती व त्यातून मोक्ष प्राप्ती करावी, असे सांगितले.

प्रभु श्रीरामाच्या व्यक्ती चरित्रातून घेतला पाहिजे

22 जुलैपासून सुरू झालेली संगीतमय श्रीराम कथा अयोध्या धाम येथून आलेले श्री राघवजी महाराज यांच्या अमृतवाणीतून भक्तगणांनी श्रवण केले. प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे. आदर्श जीवनाचा वस्तू पाठच प्रभू श्रीरामाच्या व्यक्ती चरित्रातून घेतला पाहिजे, असे प्रसंग रामकथेच्या माध्यमातून भक्तगणांसाठी सादर करण्यात आले. यावेळी नुपूर भालेराव यांनी गणेश वंदना आराध्या राजपूत यांनी गुरुवंदना तर अंतरंग आर्ट्स अकॅडमी, भुसावळ येथील बालकलाकारांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थित भक्तगणांची मने जिंकली. सूत्रसंचालन कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत तर आभार पवनकुमार दासजी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here