विजयादशमीला माजी आ. आर.ओ.तात्या पाटील यांच्या सहवासातील आठवणींना दिला उजाळा

0
37

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तापैकी दसरा सण एक मुहूर्त या पवित्र तिथीला माजी आमदार आर. ओ. पाटील यांचा जन्मकाळ सोहळा मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात तात्या साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गं. भा. कमल पाटील, सौ. वैशाली सूर्यवंशी, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, डॉ. सुरेश पाटील, डॉ.जे.सी राजपूत, डॉ.डी. आर. देशमुख, सुरेश पाटील, मेहताबसिंग नाईक, दिलीप भांडारकर आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण पुष्पचक्र तथा फुलांच्या वर्षाव करून यथाविधी पूजन करण्यात आले.

यावेळी निर्मल सीडस्‌‍चे संचालक डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, तात्या साहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांचे कार्य कर्तृत्त्वाचा सामाजिक बांधिलकीच्या तसेच हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्दता, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसायिक पंढरीची वारीचा वसा पूर्णपार उच्च संस्कार आदी सर्वांचा तात्या साहेबांच्या व्यक्तीत्वावर झालेला होता. म्हणून अत्यंत वैभवशाली, दैदीप्यमान, नेतृत्व, पितृत्व, पालकत्व जन्माला आले. त्यांच्या प्रेरणेतून निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, निर्मल इंटरनॅशनल स्कूल व आदर्श कृषी सेवा केंद्र आदी यशस्वीपणे गरुड भरारी घेत आहे. त्यांच्या आठवणी म्हणजे प्रेम, त्याग, अभिमान, आपलेपणाचा झरा आहे, अशा भावपूर्ण शब्दात आदरांजली देण्यात आली.

यावेळी मेहताबसिंग नाईक, शांताराम सर, पत्रकार महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक बांधिलकेतून अपंग बांधवांना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच होतकरु, गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकाचा संच उमेश पाटील यांचे सहकारी मित्रांना देण्यात आला. सायकल मिळालेल्या अपंग बांधवांमध्ये रवींद्र बळीराम माळी, योगेश लक्ष्मण पाटील, भगवान बाबुलाल पाटील, मनीषा राजेंद्र कोळी, मंदाबाई शंकर ठाकरे, महानंदा सुरेश वाणी, प्रदीप रमेश पाटील, लक्ष्मण गोविंद माळी, संजय भिकन पाटील, ज्ञानेश्वर नारायण पवार, पुष्पाबाई राजेंद्र चव्हाण, निखिल साहेबराव माळी, दिनकर वसंत मोरे, वाल्मीक शिवाजी पाटील, सुनील रामचंद्र मोरे, सुनील नागरे, संजय ओंकार सोनवणे, शंकर भराडी, ज्ञानेश्वर बापू पाटील, विजय हिलाल जाधव, लक्ष्मण भाऊलाल पाटील, ईश्वर सयाजी पाटील, ज्ञानेश्वर सांडू लोहार, कमलाबाई दारसिंग चव्हाण, विनोद बारकू पाटील, सुरेश दगा महाजन यांचा समावेश होता.

यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर रीना गणपत पाटील भडगाव, सोनाली रघुनाथ पाटील, कंचन मिलिंद मोरे आदी नारीशक्तींनी भगवा रुमाल घालून वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून घेतला. याप्रसंगी तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी जि.प सदस्य राजेंद्र पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, तालुका युवा अधिकारी शशी पाटील, भाऊसाहेब पाटील, अभिषेक खंडेलवाल, गोपाल परदेशी, तिलोत्तमा मौर्य, महानंदा पाटील, मंदाकिनी पारोचे, कुंदन पांड्या, भडगाव परिसरातून गणेश परदेशी, मच्छिंद्र आबा, राजू मोरे, फकीरा पाटील, अनिल महाजन, प्रकाश महाजन, संजय महाजन, शंभू तात्या, समाधान पाटील, भैय्या पाटील, रतन परदेशी, जे.के.पाटील, तुकाराम महाजन आणि माधव जगताप, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, कॉ-आर्डिनेटर श्रीमती स्नेहल पाटील यांच्यासह पक्षाचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन, प्रास्ताविक तथा आभार नाना वाघ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here