दोन हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचे काम घेतले हाती
साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :
तालुक्यातील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत वन महोत्सवानिमित्त ‘एक पेेड माॅ के नाम’ उपक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक वनीकरण विभाग जामनेर व ग्रीन आर्मी यांच्यातर्फे ‘एक पेेड माॅ के नाम’ संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक झाड देवून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी २०० वृक्षांचे वाटप मालदाभाड़ी शाळेत करण्यात आले. यासाठी भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप, तेरापंथ युवक परिषद, जैन सेवा मंडल, आदिनाथ ग्रुप, नवकार ग्रुप, जैन अलर्ट ग्रुप अशा संघटना एकत्र येऊन ग्लोबल वार्मिंगवर मात करण्यासाठी विविध शाळांच्या माध्यमातून दोन हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचे कार्य सुरू आहे, असे बीजेसचे जिल्हाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार होते.
यावेळी वनविभागाच्या वनपाल ज्योती धनगर, वनरक्षक यु.एल.गाडेकर, वनरक्षक यु.डी. भारुड़े, तेरापंथ युवक परिषदेचे संघटक मंत्री अजय सांखला, जैन सेवा मंडळाचे राहुल कोठारी उपस्थित होते. वनपाल ज्योती धनगर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यशस्वीतेसाठी ए. बी. पाटील, एन. एस. पाटील, एन. जी. पाटील, मनोज जैन यांच्यासह ग्रीन आर्मी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ग्रीन आर्मीचे विजय सैतवाल, सुत्रसंचलन आर. एल. कोळी तर आभार गणेश पाटील यांनी मानले.