दोन्ही गावांमुळे ‘आई भवानी देवराई’ होतेय विकसित
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील मोयगाव ग्रामपंचायत, वसुंधरा फाउंडेशन आणि पिंपळगाव येथील वृक्षप्रेमी मंडळी यांच्या प्रयत्नातून दोन्ही गावांच्या दरम्यान ‘आई भवानी देवराई’ नावाने देवराई विकसित केल्या जात आहे. वृक्षमित्रांच्यावतीने महाराजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी, ३ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निंब, चिंच, सीताफळ, करंज अशा झाडांची लागवड करण्यात आली.
सुरुवातीला प्रा.महेंद्रसिंह कच्छवाह यांनी महाराजांना फुलहार देऊन सत्कार केला. वृक्षमित्र डॉ.विश्वजीत सर, प्रा.डी.एस.पाटील, प्रा.महेंद्रसिंह कच्छवाह, जीवनसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पृथ्वीराज पाटील, राणाजी टेलर, नंदू आप्पा, गजानन कच्छवाह, जितेंद्र महाले, प्रेमजीत सिसोदे, गजानन सिसोदे, संजय पाटील, नामदेव चव्हाण, निलेश सिसोदे, उल्हास सिसोदे, विकी माळी, गणेश पवार, सोपान कवळे, विरेंद्र सिसोदे, विकास सिसोदे, गोपाल सिसोदे, रणवीर सिसोदे आदी वृक्षमित्र उपस्थित होते.
वृक्षमित्रांना मिठाईचे वाटप
याप्रसंगी प.पू.श्याम चैतन्य महाराज यांनी मनोगत व्यक्त करत वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ही देवराई अधिक चांगल्या प्रकारे कशी बहरुन येईल, यादृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी महाराजांच्यावतीने उपस्थित वृक्षमित्रांना मिठाईचे वाटप करण्यात आले.