चिंचोली येथील प्रस्तावित ‘मेडिकल हब’ प्रकल्पाची अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

0
29

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाची मंगळवारी दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी वृक्षारोपण देखील केले.

चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरु आहे. याठिकाणी महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जाणार आहे. मंगळवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, संजय चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संदीप जैन, विभागीय प्रमुख भीमराव कांबळे, न्याती कन्स्ट्रक्शनचे विभागीय मुख्य अभियंता संदीप गाडेकर, एक्झिक्युटिव्ह अभियंता शरद दवांगे उपस्थित होते.

यावेळी संदीप गाडेकर आणि संदीप जैन यांनी अधिष्ठाता व अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे आतापर्यंत झालेले बांधकाम व त्यातील रचना, मांडणी, कामाचा दर्जा याबाबत माहिती दिली. पूर्ण प्रकल्पाला जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बांधकामातील साहित्य, साधनसामुग्रीचा माहिती घेतली. नकाशाद्वारेदेखील बांधकामाची माहिती अधिष्ठातांना देण्यात आली. तसेच, पीपीटी व ड्रोन शूटिंगद्वारे झालेल्या बांधकाम दाखविण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांना स्वतंत्र कॉलनी उभारण्यात आली असून त्यांच्या सर्व सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी विविध विभागांचे प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. राजेश जांभुळकर, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. अब्दुल राफे, डॉ. रमेश वासनिक यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. सागर राणे, डॉ. प्रतिभा कलवले, डॉ. निशिकांत गडपायले, ग्रंथपाल आकाश पाटील यांचेसह अधिष्ठाता कार्यालयातील बांधकाम विभागाचे गोपाल सोलंकी, साहेबराव कुडमेथे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांचे वृक्षारोपण

यावेळी सुरुवातीला अधिकाऱ्यांच्या नावाने विविध प्रजातींचे वृक्ष लावण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील वृक्षारोपण केले. या प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प न्याती कंस्ट्रक्शनने केला आहे. पावसामुळे हे मेडिकल हब हिरवेगार झालेले असून पुढील वर्षभरात बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आजच्या वृक्षारोपणामुळे परिसर अजून हिरवागार व निसर्गरम्य होईल अशी अपेक्षा अधिष्ठातांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here