जीर्ण इमारत असणाऱ्यांना नोटीस द्यावी

0
42

साईमत, रावेर : प्रतिनिधी

तालुक्यात गाव व शहरी भागात मान्सूनपूर्वी नाल्यांची सफाई करावी, जीर्ण इमारत असल्यास त्यांना नोटीस द्यावी, रस्त्याने महामार्गाने पडाऊ वृक्ष काढून घेण्याच्या सूचना तहसीलदार बंडू कापसे यांनी आयोजित मान्सून पूर्व आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. रावेर तहसिलला २९ मे रोजी मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार होते. बैठकीत मान्सूनपूर्व नियोजन व तयारी करण्यासंदर्भात उपस्थित संबंधित अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, मुख्यधिकारी स्वालिहा मालगावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एम.पी.चौधरी, सह पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ, सह पोलीस निरीक्षक निंभोरा हरिदास बोचरे, भावेश चौधरी, अजय जाधव, स्वप्निल पाटील, अमोल वाघ, पुरूषोत्तम पाटील, विनय कुलकर्णी, डी.व्ही.बाविस्कर, पांडुरंग पाटील, मोहनदास महाजन, आर.व्ही.खैरनार, कांतिलाल तायडे यांच्यासह रावेर तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here