साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी–
प्रेमातून पळवून नेत कुंटणखान्यात ढकललेल्या तरुणीची सुटका केल्याच्या कामाची रोटरी क्लबने दखल घेत जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदार योगिता पाचपांडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविले.
रोटरी क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुळकर्णी, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. कीर्ती देशमुख व पूनम मानुधने उपस्थित होत्या.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तरुण-तरुणीने प्रेमाच्या आणाभाका घेत पलायन केले होते. पुण्यात त्यांनी काही दिवसच संसार केला. ानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईक महिलेच्या माध्यमातून या तरुणीला कुंटणखान्यात ढकलले होते. तेथून तिची सुटका होणे अवघड होते. यासंदर्भात तालुका पोलिसांत संबंधित तरूणी हरविल्याची नोंद होती. या मुलीवर ओढवलेल्या संकटाची माहिती मिळाल्यावर पोलीस अंमलदार योगिता पाचपांडे यांनी पुणे गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका केली होती.