साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला लागून तसेच यावल चोपडा रस्त्यावर यावल तहसील कार्यालयापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकाई-खडकाई नदी पूर रेषेला लागून असलेली 50 लाख रुपये किमतीची असलेली शेतजमीन अकृषिक परवानगी साठी फक्त 20 हजार रुपये घेऊन सोयीस्कर चौकशी यावल मंडळ विभागातून करण्यात आली असल्याचे तसेच मालेगाव,धुळे या नंतर आता यावल तालुक्यात लॅण्ड ‘जिहाद’ चा प्रभाव वाढत असल्याने अकृषिक परवानगी चौकशी प्रकरण प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी केल्यास वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसील कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतजमिनीची 50 लाख रुपयात सौदी पावती करण्यात आली असून लवकरच खरेदी होणार आहे,धुळे येथील काही नागरिकांनी यावल तालुक्यात लँड जिहाद प्रभाव यावलकरांना दाखवून दिल्याने याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सदरच्या शेतजमीनचे अकृषीक परवानगी प्रकरण संबंधीतांकडे दाखल असल्यामुळे परवानगीसाठी यावल मंडळ कार्यक्षेत्रातून सोयीनुसार चौकशीसाठी 20 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याने चौकशी झाल्याचे महसूल विभागात बोलले जात आहे.संबंधित शेत गट नंबरला लागून बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग तसेच लागूनच नदी असल्याने पूर रेषेला लागून अकृषीक परवानगी मिळणार किंवा नाही तसेच या ठिकाणी नदी असल्याने संरक्षक भिंत बांधणे कायद्याने बंधनकारक असल्याने सदरची संरक्षक भिंत ही त्या शेत गट नंबर मध्येच आहे का?किंवा महसूलच्या जागेवर आहे का?किंवा ती संरक्षक भिंत नदीपात्रात अनधिकृतपणे विना परवानगीने अनधिकृतपणे अतिक्रमण करून बांधली जात आहे का?इत्यादीसह इतर कामांसाठी नगर रचना विभाग, महामार्ग विभाग प्रमुख तसेच यावल तहसीलदार,यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल,वीज वितरण कंपनी अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून परवानगी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ही शेतजमीन खरेदी करण्याची ‘कुवत’ जळगाव जिल्ह्यात कोणाची नव्हती का? तसेच राज्यात नागपूर मुंबई, आग्रा मुंबई महामार्गानंतर आता बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावर लँड जिहाचा प्रभाव वाढणार आहे का?इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी या शेतजमिनीला संबंधित सर्व विभागाकडून अकृषिक परवानगी देताना प्राथमिक चौकशी अहवाल जो सादर केला जाणार आहे त्याबाबत प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी स्वतः या जागेची तथा गट नंबरची पाहणी प्रत्यक्ष खात्री करून नियमानुसारच चौकशी अहवाल आणि संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू आहे किंवा नाही याबाबत अकृषिक परवानगी देण्यासंदर्भात संबंधितांकडे लेखी अहवाल पाठवावा असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
सदरच्या गट नंबर मध्ये शुक्रवार दि.5 ऑगस्ट 2022 रोजी गौण खनिज वाळू,गिट्टी इत्यादी बांधकाम साठा करून ठेवल्याचे तसेच नियमानुसार अकृषिक परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू कसे?असा प्रश्न उपस्थित होऊन बांधकाम ठिकाणी वापरली जाणारी वाळू आणि गौण खनिज याचा वाहतूक परवाना कोणी कसा दिलेला आहे किंवा नाही याची चौकशी सुद्धा प्रांताधिकारी कैलास कडलग साहेब यांनी करावी असे यावल शहरातून बोलले जात आहे.