निमखेड ग्रामपंचायतीने वित्त आयोग निधीत केला अपहार

0
3

बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतीने शासनाच्या चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोग निधीचा अपहार केला आहे. प्रत्यक्षात कोणतेही कामे न करता बनावट कागदपत्रांद्वारे निधी हडपल्याची तक्रार भीमराव वाघ यांनी बोदवड पंचायत समिती आणि जळगाव जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी खोटी बिले दाखवून लाखो रूपयांचा अपहार केला असल्याचे तक्रारदार भीमराव वाघ यांनी म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील निमखेड येथील ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगान्वये निधी प्राप्त झाला होता. हा निधी ग्रामसेवक, सरपंच आणि काही सदस्यांनी हडप केला आहे. गावात निकृष्ठ प्रतीचे काम केली. काही ठिकाणी कामे न करताच बिले काढली, असा आरोप केला आहे. काही कामाचा निधी वर्ग करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार केला आहे.

ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्याचे अभय…!

बोदवड तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतमध्ये २०१८ ते २०२२ दरम्यान मोठ्या प्रमाणात चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामविकासासाठी उपलब्ध झालेला होता. परंतु निधीमध्ये अपहार झाल्याची तक्रार वारंवार करूनही त्याबाबत कारवाई केली जात नाही किंवा चौकशी सुद्धा होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला, सरपंचांना गटविकास अधिकाऱ्यांचे अभय आहे की काय? अशीही चर्चा परिसरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here