Navratri ; पहूर येथे नवरात्रोत्सवाचा जल्लोष

0
13

मंदिरांमध्ये दिव्यांची रोषणाई; श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘ज्योतीं’चे स्वागत

साईमत/पहूर, ता.जामनेर/प्रतिनिधी :  

शारदीय नवरात्रोत्सवास दि.२२ पासून उत्साहात प्रारंभ झाला. येथे देविंच्या सर्व मंदिरांमध्ये दिव्यांची आरास साकारण्यात आली आहे.नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी निवासिनी मातेच्या वनी गडावरून ‘ज्योत ‘ घेऊन आलेल्या भाविकांचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे यांनी स्वागत केले.

गावातील जय भवानी माता मंदिर , संतोषी माता मंदिर , रेणुका माता मंदिर, दुर्गा भवानी माता मंदिर, ग्रामदैवत मरीआई मंदिर या सर्वच मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली असून विद्युत दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. यासोबतच गावात विविध ठिकाणी दुर्गा मंडळांनी मुर्त्यांची स्थापना केली असून भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. नवरात्रोत्सवात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळ कार्यकर्त्यांनी सजग राहण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here