साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे श्री. मुख्तार सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयेशा सिद्दिका या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने केले. तीलावत तनवीर रजा या विद्यार्थ्याने सादर केली आणि तराना-ए- इकरा प्रा. डॉ. ईश्वर सोनगरे सरांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधून मनोगतामध्ये प्रथम वर्षाच्या चंचल कार्पेंटर, सना कौसर, सुमय्या कुरेशी, द्वितीय वर्षातून माज अहमद आणि मुजक्किर शेख या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
त्यानंतर प्रा. अजीम शेख सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाविषयी मार्गदर्शन केले शेवटी प्राचार्य डॉ. इरफान शेख यांनी भौतिक शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या विषयी माहिती दिली व पोस्टर प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले. द्वितीय वर्षाच्या फरहीन चाँद खान या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.