Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पूर्ववैमनस्यातून जामडीतील फकिराचा खून ;अल्पवयीनासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा
    क्राईम

    पूर्ववैमनस्यातून जामडीतील फकिराचा खून ;अल्पवयीनासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा

    SaimatBy SaimatJune 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

    तालुक्यातील जामडी येथे फकिर तरुणाची अल्पवयीन तरुणाने पूर्ववैमनस्यातून चाकूचे वार करीत हत्या केली होती. या प्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेतल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    तालुक्यातील जामडी येथील एका धार्मिक स्थळावर काम करणार्‍या तबरेज शहा याकूब शहा ( वय ३४ ) या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने सुमारे चार वर्षांपूर्वी विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केली होती. हा राग डोक्यात ठेवून तरुणीच्या अल्पवयीन भावाने गुरुवारी दुपारी तरुणावर पाठीमागून चाकूचे सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या खुनानंतर संतप्त नातेवाईकांनी गुन्ह्यातील आरोपींना अटकेची मागण केली होती.

    खून प्रकरणी अजमल शहा याकूब शहा यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीनासह भिकन अजीज शेख, एजाज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख (सर्व जामडी, ता.चाळीसगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.