साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पुढच्या आठवडयात येणाऱ्या श्री गणेश उत्सवाचा पार्श्वभूमीवर दि. १२ सप्टेंबर मंगळवार रोजी आयुक्त यांचे कार्यालयीन दालनाचे आ. राजूमामा भोळे यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सह आयुक्त अश्विनी गायकवाड, मनपा शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, मनपा विद्युत अभियंता एस एस पाटील, मुलेप श्री मुळे सर, नगरसचिव सुनील गोराणे, बाधकाम विभागाचे अभियंता सुशांत मेढे, योगेश अहिरे, वीज विभागाचे नवी पेठ कक्षाचे सहाय्यक अभियंता दीपक पाटील तसेच स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, डॉ. चंद्रशेखर पाटील महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत श्री गणेश स्थापनेपासून ते गणेश विसर्जना चे कालावधी पर्यंत सर्व आवश्यक बाबींचे नियोजना संदर्भात तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती व्यवस्था व लाईट व्यवस्था, आरोग्य विभागामार्फत साफ सफाई व्यवस्था, सदर कालावधीत दैनंदिन निर्माल्य संकलन व्यवस्था कामी प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 समिती निहाय स्वतंत्र वाहन व्यवस्था करणे, कचरा संकलन व्यवस्था इत्यादी बाबींवर चर्चा करून संबंधित विषयासंदर्भातील कामांबाबत संबंधितांना सूचना व त्याप्रमाणे कार्यवाही करणे बाबत आमदार राजूमामा भोळे यांनी सूचना केल्या.