मुंढोळदे-सुलवाडी पुलाच्या कामाला सुरुवात

0
7

आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

विकास कामात आ.चंद्रकांत पाटील यांनी एखादा मोठा पूल करून दाखवावा, मी त्यांचा जाहीर सत्कार करेल, अशी घोषणा यापूर्वी आ. एकनाथराव खडसे यांनी केली होती. त्यांचे राजकीय आव्हान स्वीकारत मुंढोळदे (खडकाचे) ता.मुक्ताईनगर ते सुलवाडी, ता. रावेर या दरम्यान तापी नदीवर पूल उभारण्याचा मुद्दा आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला होता. ४ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. १२ ऑक्टोबर रोजी पुलासाठी ९७ कोटी ५९ लाख ११ हजार रुपये खर्चाची वर्क ऑर्डर निघाली आहे. त्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे आणि रावेर तालुक्यातील सुलवाडी दरम्यान तापी नदीवर पूल उभारण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. भुसावळ येथील बीएनए इन्फ्रा कंपनीला हे काम मिळाले आहे. बहुप्रतिक्षित प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाल्याने पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुलामुळे उचंदे परिसर अगदी कमी अंतरात रावेर तालुक्याशी जोडला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here