शानभाग विद्यालयात संस्कृत सप्ताह निमित्त बहुपर्यायी प्रश्नमंजूषा स्पर्धा

0
37

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृत दिनानिमित्त दि. 31 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर दरम्यान इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात येत असून या सप्ताह निमित्ताने बहुपर्यायी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी व त्यांच्यात या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी हाच उद्देश या सप्ताहा मागे आहे. या सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या संस्कृत सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी संस्कृत एकल गीत गायन स्पर्धा, संस्कृत व्याकरण बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा, संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा, संस्कृत गप्पांचा कार्यक्रम या स्पर्धा घेण्यात येणार आहेत .
त्यातील व्दितीय पुष्प म्हणजे संस्कृत बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धा शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची संस्कृत व्याकरणावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धेत खूपच आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. यात आठवी ते दहावीतील एकूण ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या संस्कृत बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरेखा शिवरामे-बाणाईत, नंदिनी टाकणे , अनिता शर्मा यांनी जबाबदारी सांभाळली. यातील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील हे उपस्थित होते. यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून सुरेखा शिवरामे-बाणाईत, नंदिनी टाकणे , अनिता शर्मा यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here