Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»श्री गो.से. हायस्कुलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ समितीची भेट
    पाचोरा

    श्री गो.से. हायस्कुलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ समितीची भेट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सर्व शालेय अभिलेखे तपासून व्यक्त केले समाधान

    साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

    येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो.से.हायस्कुलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा दोन अंतर्गत जिल्हास्तरीय शाळा मूल्यांकन समितीने भेट देत शाळेच्या विविध विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. समितीत प्रमुख प्रतिभा भावसार, सुषमा इंगळे, सरोज गायकवाड, सीमा पाटील यांचा समावेश होता. त्यांनी सर्व शालेय अभिलेखे तपासून समाधानही व्यक्त केले.

    समितीने शाळेला भेट देऊन विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजना, विद्यालयातील स्वच्छता परसबाग, क्रीडांगणावर कबड्डी, खो-खो, बास्केटबॉलचे मैदान, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडीचे मैदाने, व्यायामशाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह, रंगमंच, विज्ञान, गणित प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय, ई-लर्निंग रूम, संगणक कक्ष, चित्रकला गृह, संगीत विभाग, मुख्याध्यापक कक्ष, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक दालन, कार्यालय विभाग, तांत्रिक विभाग किमान कौशल्य विभाग, शिक्षक दालन, हॅन्ड वॉश, सुरक्षा ऑडिट, सूचना/तक्रार व प्रथमोपचार पेटी, ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन, पावसाचे पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सरल प्रणाली व यु-डायस प्रणाली, आधार कार्ड अपडेट, हजर विद्यार्थी संख्येचे प्रमाण, संच मान्यता, शिक्षकांची सेवा पुस्तिका आणि विद्यांजली पोर्टलची माहिती, महावाचन अंतर्गत विद्यार्थ्यांचे अभिप्राय अपलोड करणे, सोलर सिस्टिम, ऑनलाईन माहिती पॅट अंतर्गत सर्व माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या संचयिका, समग्र प्रगती पुस्तक, शिष्यवृत्तीबाबतची सर्व शालेय अभिलेखे तपासून कौतुक केले.

    यांचे लाभले सहकार्य

    तपासणीसाठी मुख्याध्यापक एन. आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील, ए.बी.अहिरे, ए.आर.गोहिल, अजय सिनकर, एस.एन.पाटील, महेश कौंडीण्य, आर.बी.बोरसे, क्रीडाप्रमुख एस.पी.करंदे, डी.आर. टोणपे, पी.एम. पाटील, अरुण कुमावत, आर.बी.तडवी, रुपेश पाटील, आर.बी.कोळी तसेच सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांंचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.