पाचाेऱ्यातील श्री.गो.से. हायस्कुल प्रगतीच्या यशोशिखरावर

0
9

भावी पिढ्या घडविण्यात शाळा ठरतेय अग्रेसर

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात श्री. गो.से.हायस्कुल भावी पिढ्या घडविण्यात ही शाळा सदैव अग्रेसर राहिली आहे. शहरातील सर्वात जुनी व गौरवशाली इतिहास प्राप्त असलेली जिल्ह्यातील नामांकित शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. पाचोरा शहरात सर्वात मोठी व सर्वात जास्त विद्यार्थी संख्या शाळेचे वैभव आहे. तसेच शाळेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा सदैव उंचावत राहिला आहे.

चित्रातील विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या क्रियेतून आमची गती दिसत आहे. शाळेच्या केलेल्या रेखांकनाच्या सर्वत्र घडलेली पिढी प्रतिकात्मक चित्रांच्या रुपात काढलेली दिसून येत आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्टिस्ट, वैज्ञानिक, खेळाडू, कॉम्प्युटर तज्ज्ञ, गायक, अशा विविध क्षेत्रातून १९३६ पासून विद्यार्थी घडत आहेत. यासोबतच संस्कारांची मूल्य जोपासणारे विद्यार्थी आणि देशाचा उत्तम व सुसंस्कारी नागरिक घडविणे ही शाळेची भक्कम बाजू आहे.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानूनच शाळेचा प्रत्येक घटक त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटत असतो. यासाठी मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील, पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, अंजली गोहिल यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here