पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या ३ दिवसात ३ मोटार सायकली चोरीला गेल्या आहेत.गेल्या दोन दिवसापूर्वी माजी नगरसेवक उल्हास पाटील वाकी रोड यांची मोटार सायकल दिवसा ढवळ्या स्मशान भूमी जवळील ईदगाह मैदान येथून चोरीला गेली आहे.तर रात्री शहरातील साईनाथ नगर भागातून चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुचाकी वाहने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दोन्ही शेजारी राहणाऱ्या साईनाथ नगरमधील रहिवासी गोविंद इंदल चव्हाण यांच्या घरासमोरून त्यांची पल्सर (क्र.एम.एच.१९ ईजे ४३८६) आणि नंदा भिका कोळी यांच्या घरासमोरून त्यांची एचएफ डीलक्स (क्र.एम.एच.१९ बीके ८२२८) या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. गोविंद इंदल चव्हाण आणि नंदा मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, चोरी करतानाचे चोरट्यांचे फुटेज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असू, त्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
सध्या शहरातील अनेक भागांत दुचाकी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी शहराच्या मुख्य रस्त्यांसह गल्ल्यांमध्येही गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्यांचा लवकरच शोध लागेल का? हा प्रश्न अनुत्तरीय आहे. कारण चोरट्यांचे चेहरे त्यात स्पष्ट दिसत नाहीत.