साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीतर्फे आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नि:शुल्क चिकित्सा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन प. पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी (ता. जुन्नर) येथे करण्यात आले होते.
योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजूंना या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेता यावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुरुवातीला योग निसर्गोपचार तज्ज्ञ प्रा. सोनल महाजन यांनी निसर्गोपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. अनंत महाजन यांनी पंचमहाभूत चिकित्सा पद्धती विषयी माहिती दिली.
प्रा.सोनल महाजन यांनी तपासणी करुन शिबिरार्थींना आहर आणि त्यांच्या विविध विकारांबद्दल व्यक्तिशः मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये एक्यूप्रेशर, ॲक्युपंचर, योगचिकित्सा, आहार मार्गदर्शन पंचमहाभूत चिकित्सा, सामान्य घरगुती उपचार, दैनंदिन दिनचर्येतील बदल याविषयी माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी जगदिश तळेले, वरदा तळेले, तसेच प. पू . भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट कांदळी येथील भक्तगण, सेवकांचे विशेष सहकार्य लाभले.