साईमत धुळे प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने विजय प्राप्त केला. या मध्ये धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी प्रचंड मतांनी ऐतिहासिक विजयचा गुलाल उधळला. धुळे ग्रामीणच्या ग्रामस्थांमध्ये उत्सहाचे वातारवण झाले आहे. आ.राम भदाणे यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. नुकताच अंचाडे येथे नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भदाणे व विधान परिषदचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान अंचाडे गावाचे सरपंच तथा मुख्याध्यापक चुनीलाल पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. राम भदाणे यांनी अंचाडे गावातील ग्रामस्थांचे आभार मानताना मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांना विश्वास दिला कि, धुळे ग्रामीणच्या मतदारांनी ज्या कार्यासाठी विश्वास ठेवून मला विधानसभेत पाठवले आहे. मी सर्वाच्या अपेक्षा प्रमाणे कार्य करेल. धुळे ग्रामीण मतदार संघात विकास कामे करण्यात अधिक भर देईन. या प्रसंगी माजी जि प सभापती प्रा.अरविंद जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, चेअरमन जयराम पाटील, जि. प. आशुतोष पाटील, सुमित पवार, प्रा.डि.बी. पाटील, गुलाबराव पाटील, नानाभाऊ शामजी पाटील, विद्याधर पाटील, राजू शर्मा उपस्थित होते.
परिसरातील व गावातील जेष्ठ नेते सजन पाटील, शालिग्राम पाटील, गंगाराम पाटील, मुकुंदा शिंदे, डा. विष्णू मोरे, मनोहर पाटील, डॉ प्रविण साळुंके,रमेश साळुंके, लखीचंद पाटील, एम.डी.पाटील, आबाजी भामरे, शिवाजी शिंदे, अरूण भामरे, धनराज साळुंके, सुनील बोरसे, प्रविण मोरे, किशोर मोरे, प्रेमचंद जैन, दिलीप साळुंके, अरूण मोरे,राजेंद्र पाटील, भगवान साळुंके, कैलास साळुंके, भालेराव साळुंके, शांताराम शिंदे,चंदन मोरे,विजय भामरे, दशरथ वैराळे,महेश साळुंके, निलेश सोनवणे, कुंदन साळुंके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.