Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»आमदार अपात्रता : ३४ याचिकांची आता ६ याचिकांमध्ये सुनावणी घेणार
    Uncategorized

    आमदार अपात्रता : ३४ याचिकांची आता ६ याचिकांमध्ये सुनावणी घेणार

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काल सुनावणी पार पडली. आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. कालच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आली. ३४ वेगवेगळ्या याचिका आता यापुढे ६ याचिकेत मांडल्या जातील. ठाकरेंच्या वकिलांनी पुन्हा एक नवा अर्ज दिला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. २५ ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे २६ ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल.
    ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सुप्रीम कोर्टातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवाद आहे. इथे प्रक्रिया आहे. इथे ट्रायल होते, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
    राहुल नार्वेकरांची नाराजी
    राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. दरवेळेस वेगवेगळ्या अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला.जर मी सुनावणी घेत आहे तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचना राहुल नार्वेकरांनी दिल्या.
    ॲड. सनी जैन काय म्हणाले?
    काल तारीख होती ती याचिका एकत्रित करण्यासाठी होती. ६ याचिकामध्ये क्लब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ते १६ ठाकरे गट याचिका गृप ए, याचिका नंबर १७ ठाकरे गटाकडून अपक्ष आमदार विरोधात दाखल केल्या आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारे वेळ वाढवून घेत नाही. फक्त अर्ज दाखल केला. आम्हाला कागदपत्र रेकॉर्डवर आणयाचे आहेत. ज्यामध्ये २ जुलैला व्हीप आमच्या गटाकडून समोरच्या आमदारांना देण्यात आला होता. वेळापत्रक संदर्भात आम्ही आक्षेप घेतला आहे आणि त्यावर निर्देश सर्वोच्च न्यायालय देईल, असे ठाकरे गटाचे वकील सनी जैन म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.