भवानी पेठ दुर्गोत्सव मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

0
12

माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी

सध्या नवरात्रीचा उत्सव सर्वत्र जोरदार सुरू आहे. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. न्हावी दरवाजाजवळील भवानी पेठ दुर्गोत्सव मित्र मंडळांनी दहावी, बारावीमध्ये यश संपादन केलेल्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून सखोल अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. यश संपादन करून आई-वडिलांसह गुरुजनांचे नाव आपण उंचावर नेण्याचे प्रयत्न करावा. अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा जोमाने आपण अभ्यास करावा, असे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी मनोगत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, महिला, पुरुष, भक्तगण यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले.

यांचा प्रमाणपत्र देऊन झाला गौरव

यावेळी पल्लवी कोळी, गायत्री गुरव, सृष्टी कोचुरे, कोमल कोळी, किर्ती सोनार, दिव्या गुरव, पूनम कोळी, तन्मय कोळी, हर्षल कपले, हरीष चौधरी, सोहम खेवलकर, मोहित रावते, हर्षल रावते, किरण कोळी या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here