Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Muktainagar:धडक कारवाई! मुक्ताईनगरमध्ये गुटखा तस्करांचे धाबे दणाणले
    क्राईम

    Muktainagar:धडक कारवाई! मुक्ताईनगरमध्ये गुटखा तस्करांचे धाबे दणाणले

    saimatBy saimatJanuary 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Muktainagar: Bold action! Gutkha smugglers busted in Muktainagar
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तस्करांमध्ये खळबळ

    साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

    अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई आज सकाळी मुक्ताईनगरमध्ये पार पडली. मुक्ताईनगर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने १० ते १२ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

    सापळा रचला आणि कार थांबवली

    मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून मुक्ताईनगरजवळील खामखेडा पुलावर पहाटेपासून नाकाबंदी करण्यात आली. संशयास्पद वाटणारी ‘आर्टिका’ कार थांबवून झडती घेतली असता, गोण्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा सापडला.

    मोठा मुद्देमाल ताब्यात

    पोलिसांनी कारमधील गुटखा आणि वाहन ताब्यात घेतले. सध्या हा गुटखा कोणाचा होता आणि कोणाला पोहोचवला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    तस्करांमध्ये दहशत; नागरिकांमध्ये समाधान

    जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आधीच कडक बंदोबस्त असताना, ही धडक कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे. परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत अवैध धंद्यांविरुद्ध अशीच मोहीम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.