धरणगावला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे रविवारी मॅरेथॉन स्पर्धा

0
10

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी या उद्देशाने धरणगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता पीएम “रन फॉर स्किल” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

रविवारी होत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चे २०० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धक भाग घेणार आहेत. स्पर्धेत १६ वर्षाच्या पुढील मुले-मुली व स्त्री-पुरुष यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेची सुरूवात रविवारी सकाळी ७ वाजता शासकीय आय.टी.आय. पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते परत शासकीय आय.टी.आय.पर्यंत असणार आहे.

रोख बक्षिसांसह प्रमाणपत्र मिळणार

मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकास ३ हजार रुपये, २ हजार रुपये व १ हजार रुपये असे स्वतंत्र रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. रोख बक्षिस व प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी दिलीप वाघ (९४०३५५००१७) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण, प्रभारी एम.ए.मराठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here