लोहाऱ्यातील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

0
33

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ए.ए.पटेल यांच्या संकल्पनेतून मुलांना मराठी भाषेचे महत्त्व कळावे, यासाठी व खान्देशमधील कवींची ओळख व्हावी, यासाठी शाळेत विविध कवी यांच्या कविता, त्यांचे लेख व छायाचित्र यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष विश्‍वास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी राज्य साहित्य संमेलन पुरस्कार प्राप्त तथा ‘पांगल्या पायवाटा’ प्रसिद्ध कविता संग्रहाचे कवी टी.जे.पाटील (माजी अभियंता), ए.ए.पटेल होते.

व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका सौ.यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. त्याचबरोबर विद्यालयातील उपशिक्षक श्री.इंगळे यांनी मराठी भाषा व तिचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच विद्यालयाचे उपशिक्षक श्री.खोडपे यांनी मराठी भाषेचा इतिहास मुलांना सांगितला.

यावेळी टी.जे.पाटील यांनी आपल्या कवितेमधून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजून सांगितले.अध्यक्षीय मनोगतात विश्‍वासराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक बी.एन.पाटील तर आभार श्री.इंगळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here