आपल्याला माहित आहे का ? सर्वाधिक जीवनसत्व पुरवणाऱ्या फळांमध्ये पेरूचा दुसरा क्रमांक लागतो. हा फळ खाताना कधी गोड त कधी आंबट अशी चव या फळाला आहे. विशेष म्हणजे या फळामध्ये शरीराला अवाक्षक असलेले अ , क आणि के हे तीन महत्वाचे जीवनसत्व असता म्हणून पेरू खाणं हे खूप लाभदायक आहे असा म्हंटलं जातं. पेरू खाल्ल्याने शरीराला आवश्यक लोह (आयर्न) या खनिजाचा पण लाभ होतो.
हा फळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्या शरीरलाला होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण सुद्धा देतो, म्हणून पेरू आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात (थंडीच्या दिवसांत) होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण देणारे फळ म्हणून पेरू आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
जाणून घ्या पेरू खाण्याचे अनेक फायदे –
पचनक्षमता : दररोज एक पेरू खाल्ल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते व शरीराला क, अ आणि के ही तीन जीवनसत्वांचा तसेच लोह (आयर्न) या खनिजाचा लाभ होतो.
पोटाचे विकार : दररोज एक पेरू खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार बरे होण्यास आणि जंतांचा त्रास कमी होण्यास मदत होते. याच कारणामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना दररोज एक पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो.
अपचन, बद्धकोष्ठता : दररोज एक पेरू खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता या समस्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.
मधुमेह : पेरू या फळात भरपूर फायबर आहे तसेच हे फळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखण्यास मदत करते.
वजन : पेरू खाल्ल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते.
गरोदर महिलांसाठी पेरू फायद्याचा : गरोदर महिलांना दररोज एक पेरू खाल्ल्याने क, अ आणि के ही तीन जीवनसत्वांचा तसेच लोह (आयर्न) या खनिजाचा लाभ होतो. शरीराला भरपूर फायबर मिळते.
दातांचे दुखणे : पेरू खाल्ल्याने दातदुखीच्या त्रासात आराम मिळतो. तोंडाला येणारी दुर्गंधी पेरू खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) : पेरू खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता अर्थात इम्युनिटी वाढते तसेच तणावामुळे होणारे त्रास कमी होण्यास मदत होते.