जळगाव ः प्रतिनिधी
येथील समाजसेविका व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी आपल्या नातीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील अंगणवाडीतील 30 जुन रोजी सहपरिवार आणि आपल्या नातीच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थींनींना दप्तरे वाटप केली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बऱ्याचदा आपण असे वाढदिवस खुप मोठ्या पद्धतीने व खर्चिक पद्धतीने साजरा करतो परंतु मनिषा पाटील यांनी या लहान बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तर वाटप करण्याचे ठरविले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून त्यांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याबद्दल संदेशही दिला.
यासाठी त्यांना घरातून आपल्या पतीची मुलांची व सुनांची देखील साथ लाभली आहे. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, मी सर्वांनाच आवाहन करू इच्छिते की, वाढदिवसासाठी वायफळ खर्च न करता तो पैसा ज्या गरीब मुलांना खरोखर शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांच्यासाठी करावा. यात दुग्धशर्करा योग म्हणजे ज्या प्रमाणे चंद्राच्या कलेप्रमाणे नात वाढू लागली तसे त्यांनी दरमहा एक वृक्ष लावून जोपासले व आज ती 1 वर्षाची होतांना त्यांनी पाच देशी वृक्षांचे रोपण सहपरिवार अंगणवाडी येथे केलें. याप्रसंगी लहान मुलांचा आवडीचा खाऊ वाटप करून आपल्या नातीचा वाढदिवस साजरा केला.यावेळी सरपंच सरला आहिरे , उपसरपंच बाळू चौरे, अंगणवाडी सेविका उज्वला चौरे, अंगणवाडी सुपरवायझर जया जाधव,छाया जाधव ,मंगला माळी ,सुशिला महाजन व इतर पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.