बसस्थानकातील दुचाकी चोरी; आरोपींना तीन दिवसांची कोठडी
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी :
नविन बसस्टँड परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटनांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्याने धडक कारवाई केली असून, तीन आरोपींना ताब्यात घेऊन दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याला (CCTNS क्र. ४३/२०२६) अंतर्गत दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून प्रभारी अधिकारी यांनी तत्काळ पथक तयार केले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध सुरू केला.
गोपनीय तपासानंतर आरोपी मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि अबुबकर नईम कौसर (रा. मालेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांनी जळगाव शहरातील नविन बसस्टँड येथून चोरी केलेल्या मोटार सायकलची कबुली दिली. जप्त मोटार सायकल ही हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH१९BS१५७३) असून, तिचा इंजिन नंबर HA१०EJDHG४२३७१, चेसीस नंबर MBLHA१०AMDHG४१६६७ आहे.
पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशीत आरोपींनी पुढील तपशीलही दिले. त्यांनी सांगितले की, TVS रायडर मोटार सायकल (MH१५ F३६०९) नाशिक येथून जळगाव येथे आणून ती साक्षीदाराला विकली होती आणि कागदपत्रानंतर बसस्टँडवर ठेवण्याचे आदेश दिले होते. नंतर ही मोटार सायकल मालेगाव येथे नेली गेली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत. हा तपास पोलीस अधीक्षक डा. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, प्रभारी अधिकारी जिल्हापेठ पोलीस ठाणे आणि पोलीस पथकातील इतर सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोह महेश महाजन, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, पोको तेजस मराठे, राहुल पाटील, नरेंद दिवेकर, अमीत मराठे, प्रविण जाधव यांचे विशेष योगदान राहिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्रकार जागरूकतेचा इशारा ठरत असून, पोलीस प्रशासन चोरी आणि गुन्हेगारांविरोधात काटेकोर कारवाई करत असल्याचे सांगितले आहे.
