पिंपरुडला पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी मुला-मुलींची अनुदानित आश्रमशाळेत महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :
पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी मुला-मुलींचे अनुदानित आश्रमशाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्रतिमा पूजन करुन उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामदास बैरागी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन नेहेते उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापका यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट तसेच स्वच्छतेचे आणि स्वावलंबनाचे अहिंसेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमानंतर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र- मैत्रिणी यांनी शाळेचा परिसर सामूहिकरित्या स्वच्छ केला. शिक्षकेतर कर्मचारी शुभम महाजन, शिवदास महाजन, विवेक महाजन यांनी कार्यक्रमाची आखणी नियोजन व्यवस्थितरित्या पार पाडले. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षिका प्रियंका भिरूड तर प्रीती झोपे यांनी आभार मानले.