साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुंझर येथे सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून प्रयास शार्लेट संस्था, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान चाळीसगाव, लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव, जलमित्र परिवार, सहज जलबोध अभियान, भूजल पाणी समिती, कुंझर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहयोगाने शनिवारी, ११ मे रोजी राम बल्ली डोंगरावर सकाळी ६ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंत महाश्रमदानाचे आयोजन केले होते.
त्यात सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून मागील ३ महिन्यापासून माथा ते पायथा या पद्धतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. त्यात शेकडो सीसीटी, डीप सीसीटी, दगडी बांध तयार केले आहेत. आज त्या सीसीटी श्रमदानातून व्यवस्थित केल्या गेल्या. यासाठी गावातून बहुसंख्य बंधू आणि भगिनीं उपस्थित होत्या.
श्रमदानात चाळीसगावहून लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्रा राजपूत, ब्राह्मणशेवगे येथील जलमित्र, सामाजिक कार्यकर्ते व निसर्ग टेकडी संकल्पक सोमनाथ माळी, भूजल अभियान चाळीसगावचे समन्वयक पंकज राठोड, प्रवीण राठोड, नवनाथ राठोड तसेच गावातून भूजल टीमचे भागवत बैरागी, प्रल्हाद सोनवणे, बंडू पाटील, समाधान महाजन, महेंद्र पाटील, राहुल ढीवरे, बालू बाजीराव ढीवरे, अशोक खांडेकर, धर्मा चौधरी, राजेंद्र गढरी, जगन महाजन, अशोक चौधरी, प्रवीण वाघ, आबा मराठे, विनोद मोरे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.