महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी रक्तदान करून साजरा केला अवतरण दिन

0
29

फैजपूर : प्रतिनिधी

येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून अवतरण दिन साजरा केला. सुरत येथील राजूभाऊ राणे यांच्या तर्फे ४५ गुलाब पुष्पहार अर्पण करून मोतीचूर लाडूची तुला करण्यात आली. रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करताना राष्ट्रीय कार्य तसेच समाजाभिमुख उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत, असा संदेश त्यांनी दिला. रक्त संकलनाचे कार्य संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांचे संचालक नितीन इंगळे व रक्तपेढी समन्वयक नेमचंद बऱ्हाटे यांच्या संपूर्ण टीमसह सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत रक्त संकलनाचे कार्य केले. दिवसभर परमपूज्य महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी सतपंथ मंदिरात श्रद्धाळू भक्तगण, सामाजिक, राजकीय, तथा अधिकारी वर्ग, डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, दिव्यांग बांधव यांनी महाराजांचे अभिष्टचिंतन केले.

यांची होती उपस्थिती

यावेळी संत सुरेश शास्त्री मानेकर बाबा, संत श्याम चैतन्य महाराज, ह.भ.प.धनराज महाराज, ह.भ.प. भानुदास महाराज, महंत नितीन महाराज, प्रांत कैलास कडलक, आ. संजय सावकारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे, डॉ. केतकी पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, श्रीराम पाटील, पद्माकर महाजन रावेर, अनिल चौधरी भुसावळ, एपीआय जालिंदर पळे, धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी.आर. चौधरी, प्रभारी प्राचार्य अनिल भंगाळे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मिलिंद वाघुळदे, विष्णू भंगाळे, प्रभाकर सोनवणे, नरेंद्र नारखेडे, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, मुखी गण, पत्रकार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here