एडवंटा कंपनीच्या वतीने पार पडला.
साईमत/जामनेर /प्रतिनिधी
तालुक्यातील नाचनखेडा कार्यक्षेत्रातील भीलखेडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी २, दूध संस्था चालक व पशुपालकांसाठी “चारा लावा, पशुधन वाढवा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम एडवंटा कंपनीच्या वतीने पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतिशील शेतकरी श्री सुधाकर पाटील (भीलखेडा) आणि श्री प्रकाश पाटील (दोंदवाडे) यांच्या हस्ते गीरगायींचे गो पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विठुरायांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनही झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा नाचनखेडा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी शेतकऱ्यांना चारा लागवड करून पशुधन वाढवण्याबाबत
सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी “चाऱ्याची लागवड करा व पशुधन वाढवा” या घोषवाक्यानुसार प्रशिक्षण दिले. तसेच, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज कसा करावा आणि कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, याची माहिती दिली आणि लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच दुधाळ जनावरांचे दररोजचे चारा व्यवस्थापन कसे करावे, याची सविस्तर माहितीही डॉ. पाटील यांनी दिली.
कार्यक्रमात एडवंटा कंपनीचे मॅनेजर विशाल वाघ यांनी मेगा स्वीट, जम्बो सुपर, शुगर केज कंपनीच्या विविध जातींच्या बियाण्यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे चाऱ्याची लागवड कशी करावी, त्यातून किती उत्पादन मिळते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शुगर केज बियाण्याचे वाटप करण्यात आले. जम्बो सुपर आणि मेगा स्वीट बियाण्याची लागवड करून चारा उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी सुधाकर पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पंचक्रोशीतील दूध संस्थाचालक व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
