चोपडा महाविद्यालयात चांद्रयान-३ मोहिमेचा घेतला लाईव्ह आनंद

0
20

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागामार्फत ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आयसीटी हॉलमध्ये सुविधा उपलब्ध केली होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी, प्रा. एन. एस. कोल्हे, महाविद्यालयाचे समन्वयक व भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

सुरुवातीला भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ यांनी मोहिमेची पार्श्वभूमी व यापूर्वीच्या भारत व इतर राष्ट्रांच्या मोहिमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंगच्या लाईव्ह प्रक्षेपणाचा सर्वांनी त्या ठिकाणी आनंद घेतला. जगाच्या व भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार महाविद्यालय परिसरातील सर्व कर्मचारी वृंद झाले.

‘याची देही, याची डोळा’ अनुभव

इस्रोच्या चांद्रयान मोहीम ३ यशस्वीतेचा ‘याची देही, याची डोळा’ अनुभव सर्वांनी घेतला. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोहिमेच्या यशाबद्दल फटाके फोडून व भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा केला. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्यांनी मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल इस्रोच्या सर्व वैज्ञानिक टीमला व सर्व भारतीयांना भव्य दिव्य यश संपादनासाठी कौतुक केले. तसेच मोहिमेच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन केल्याबद्दल भूगोलशास्त्र विभागाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here