साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
यावल न.पा.कॉम्प्लेक्स मध्ये ताडी विक्री दुकानाचा परवाना जो दिला ‘तो’ ताडी विक्री दुकानाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडीच्या नशेत दिला आहे की संबंधिताने राज्य उत्पादन शुल्क विभाग यावल ( भुसावळ ) व जळगाव यांची फसवणूक आणि आर्थिक संगनमत करून ‘ताडी’ दुकानाचा परवाना मिळविला आहे का ? असा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला असल्याने संपूर्ण यावल शहरात चर्चेला उधाण आले आहे.
श्रीधर के.सुर्वे जन्म माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्याकडील दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी मिळालेले पत्र व त्यासोबतची मिळालेली माहिती प्रत्यक्ष बघितली असता यावल येथील मेरगु नारायण गौंड रा.करीमनगर,नमापूर. (आंध्र प्रदेश)याने यावल नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील गाळा क्र.62’अ’ मध्ये ताडी विक्री व्यवसायासाठी गाळाधारक नितीन श्रावण सोनार दि.1/8/2022 रोजी करारनामा करून ताडी विक्री परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता आणि आहे.
ताडी विक्रीचा परवाना मिळण्यासाठी केलेल्या अर्जासोबत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांचे कार्यालयात दिलेले कागद पत्रात दि.29/7/2015 रोजी यावल नगरपालिका मुख्याधिकारी यांनी जो ‘नाहरकत’ दाखला दिला आहे त्या ना हरकत दाखल्यात यावल नगरपरिषद मालकीचे यावल येथील फैजपुर रोडवरील सिटी सर्वे नंबर 3830/2 पैकी मधील व्यापारी संकुलनातील गाळा क्र.62 मध्ये व्यवसाय करण्यासाठी इलेक्ट्रिक मीटर घेण्यासाठी अटी शर्तीवर ना हरकत दाखला देण्यात येत असल्याचे पहिल्या तीन ओळीत स्पष्ट नमूद केले आहे.
यावल नगरपरिषदेने दिलेल्या ना हरकत दाखल्यात कुठेही ताडी विक्री दुकान व्यवसायाबाबत नमूद केलेले नसताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडी विक्री व्यवसाय परवाना दिला कसा? हा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणात ताडी विक्री व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी संबंधितांनी ताडीच्या नशेत आणि आर्थिक संगणनताने ताडी व्यवसाय परवाना देताना कोणी कोणाची फसवणूक केली… हा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित पुढील कारवाई केव्हा करणार याबाबत संपूर्ण यावल शहरासह तालुक्याचे लक्षवेध आहे.