शानभाग विद्यालयात समाधान पाटील यांंचे व्याख्यान

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

शिवजयंती प्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयात लेखक, कवी समाधान हेंगडे पाटील यांचे “ प्रेरणा शिवाजी महाराजांची ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
समाधान चंद्रभान हेंगडे पाटील यांच्यासोबत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील , विभाग प्रमुख सौ. रुपाली पाटील आणि स्वप्निल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.

पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जीवनप्रवास, युद्धकौशल्य, प्रशासनिक धोरणे, आणि स्वराज्य स्थापनेसाठी केलेला अथक संघर्ष या बाबी प्रेरणादायी आहेत. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, धैर्य आणि साहस, विचारधारा आणि नेतृत्व, गडकिल्ले आणि धोरण, मुलायम हृदय असलेले योद्धा, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, लहान वयात महान कार्य तसेच अद्वितीय नेतृत्वशक्ती, न्याय, धैर्य आणि देशभक्तीच्या मूल्यांचा विद्यार्थ्यांना पाठ दिला.

व्याख्यानादरम्यान, पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात संयम, परिश्रम आणि ईमानदारीच्या मूल्यांचे अनुसरण करण्याचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने कर्तव्याचे परिपालन करणे आणि समाजात चांगले बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.

प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय सौ. शुभांगी नारखेडे यांनी केला. गणेश लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून मिळालेल्या प्रेरणेसाठी आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देखील हा कार्यक्रम प्रेरणादायक आणि समृद्ध करणारा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी महाराजांच्या आदर्श नेतृत्वाचा ठसा सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here