वाकडी आरोग्य केंद्रात पोषण अभियानासह ‘आयुष्यमान भव’ मोहिमेला प्रारंभ

0
8

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातीलवाकडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी ‘आयुष्यमान भव’ आणि राष्ट्रीय पोषण अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी गरोदर मातांना आहार व गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ‘आयुष्यमान भव’ ही मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात तर पोषण अभियान १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे होते.

‘आयुष्यमान भव’ योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची नोंदणी करून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आभा कार्ड वितरित करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड धारकांना नोंदणीकृत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. तसेच अभियानात बीपी, डायबेटीस, कॅन्सर, टीबी, कुष्ठरोग, गरोदर माता, नेत्ररोग, सिकलसेल यांची तपासणी करून वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोषण अभियानात कुपोषित बालकांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच किशोरवयीन मुलींची तपासणी, गरोदर मातांची तपासणी व गरोदर मातांना सल्ला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मोहिनी मोरे, डॉ.सागर पाटील, डॉ.राहुल वाणी, डॉ.विजयसिंह पाटील, डॉ.अश्विनी वाघ, अंगणवाडी सेविका संघमित्रा इंगळे, ज्योती औटी, लता राजपूत, इंदूबाई वाणी, छाया सुरवाडे, राधा राजपूत, शकुंतला औटी, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक गोपाळ पाटील, व्ही.एच.माळी, आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे, आरोग्य सेवक सुनील बोरसे, स्वप्नील महाजन, अनिल सोनवणे, अनंत गंगातिरे, विनोद पाटील, धीरज पाटील, आरोग्य सेविका मनीषा पवार, मंगला सोळंके, दुर्गा जाधव, कविता पांढरे, चित्रा बिलगे, गटप्रवर्तक ज्योती पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मीनाक्षी बिंदवाल, पूजा रबरे, रोहित गोयर, चरण चव्हाण, जावेद तडवी, सांडु गोंधळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी तर हेमंत पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here