साईमत जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील वावडदे येथील एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये( L H patil English mediun school ) आज दि.28 जून 2023 रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक श्री जितेंद्र पाटील सर श्री वीरेंद्र पाटील सर सौ वैशाली पाटील मॅडम, मुख्याध्यापिका सौ जयश्री पाटील मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ सुजिता सोळंखे मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शिक्षिका सौ अश्विनी पाटील मॅडम यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विषद केले. संगीत शिक्षक श्री कुशराजे पवार सर आणि ग्रुप यांनी विठ्ठठलं विठ्ठल हे गीत सदर केले.
यानंतर सिनियर केजी च्या मुलींनी ‘ये ग ये ग रखुमाई ‘ या गीतावर सुंदर असा नृत्याविष्कार सादर केला.सौ स्वाती जाधव मॅडम आणि सुकन्या पाटील मॅडम यांनी महाराष्ट्राची परंपरा आणि वारकरी संप्रदाय याविषयी अधिक माहिती व ओळख आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना करून दिली.इयत्ता 6 ब च्या विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक व श्री विठ्ठल यांची कथा नाट्यरूपाने सादर केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका अन्वेशा माहेश्वरी मॅडम यांनी केले. त्यानंतर श्री विठ्ठल रुखुमाईची पालखी व दिंडी सोहळा काढण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी धोती कुर्ता, टोपी, तर विद्यार्थिनींनी नववारी लुगडे असा वारकरी संप्रदायला शोभेसा वेष धारण केलेला होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन करताना शिक्षक श्री विशाल पवार सर यांनी विविध संतांचे अभंग व त्याचे दाखले दिले. क्रीडा शिक्षक श्री आनंद जाधव सर व विद्यार्थ्यांनी लेझीम द्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल…..’च्या जयघोशाने सर्व परिसर विठ्ठलमय झाला होता.