Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Pune Crime : पुणे वाघोलीत चहा पिताना तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला; आरोपी अटक
    क्राईम

    Pune Crime : पुणे वाघोलीत चहा पिताना तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला; आरोपी अटक

    saimatBy saimatMarch 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोयता थेट डोक्यात अडकला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; रुग्णालयात गंभीर जखमी

    साईमत / स्नेहल निमगिरे, पुणे / प्रतिनिधी

    पुण्यातील वाघोली परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका भयानक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चहा पिण्यासाठी थांबलेल्या नागेश जगताप या तरुणावर अचानक कोयत्याने हल्ला झाला. हल्ला इतका भीषण होता की कोयता थेट त्याच्या डोक्यात अडकला.

    माहितीनुसार, नागेश आपल्या मित्रासोबत रायसोनी कॉलेजसमोर हॉटेलसमोर चहा पित होता. या वेळी जुन्या वादातून संतप्त आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन मित्रांसह तेथे आला. सुरुवातीला वादविवाद झाला, त्यानंतर आरोपीने नागेशवर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर इजा झाली. आरोपीने मारलेला कोयता डोक्यात अडकल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.

    जखमी नागेशला वाचवण्यासाठी धावलेल्या मित्र सिद्धेशलाही या हल्ल्यात दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी दोन्ही जखमी तरुणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

    संपूर्ण हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपी नागेशवर कोयत्याने हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे मुख्य आरोपी मंगेश सांगळेला अटक करण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि त्याचे दोन मित्र कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

    सध्या जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव पोलिसांच्या गोपनीय माहितीतून मालेगाव टोळीचा पर्दाफाश

    March 16, 2026

    Government Employees : आठव्या वेतन आयोगाचा आनंद! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 20 ते 35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

    March 16, 2026

    Dharangaon : पैशांच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.