केकतनिंभोरेला ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहीहंडीचा उत्सव उत्साहात

0
16

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील केकतनिंभोरा येथील दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई पॅटर्न) येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. तसेच गोपाल कृष्ण भगवान यांचा जन्माष्टमीचा कार्यक्रमही दहीहंडी फोडून साजरा केला.

संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व बाल गोपाळ कृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी ओशन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक, शिक्षिका यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. तसेच ज्युनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षक बनून ज्ञानार्जनाचे काम केले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा परिपाठ विद्यार्थ्यांना विषद केला. तसेच बालगोपाल कृष्ण यांच्या लिला विद्यार्थ्यांना गोष्टी स्वरूपात सांगितल्या. यावेळी सुचिता सोनवणे, सीमा श्रोत्रीया, निलिमा सपकाळे, सागर जोशी, आयुष शिंदे, गुंजन राजपूत, सह्याद्री पाटील, कोमल शिंदे, संजना सोनी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here