भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली.
साईमत/भुसावळ /प्रतिनिधी :
भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाच्या गृह विभागाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.केदार बारबोले यांनी यापूर्वी सन २०२४ मध्ये जळगाव येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असून जिल्ह्याची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. शांत, संयमी व शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख असून त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलाला अनुभवी नेतृत्व मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भुसावळचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची पदोन्नतीवर बदली होणार आहे.
यापूर्वी भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची बढतीवर पुणे टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी जळगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची ३१ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच महिन्यांतच गावीत यांची पुन्हा बदली होत असून त्यांना उच्च पदावर बढती मिळणार आहे.या प्रशासकीय बदलांमुळे भुसावळ पोलिस यंत्रणेत नव्या पर्वाची सुरुवात होत असून आगामी काळात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
