साईमत यावल प्रतिनिधी
महाराणा प्रतापनगर मधील व शहरातील अनेक भाविक महिला,पुरुषांनी आज बुधवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी यावल शहरातून शेळगाव बॅरेज पर्यंत भव्य अशी कावड यात्रा काढून शेळगाव बॅरेज मधील ( पवित्र तापी नदी जलाशयातील गंगाजल ) पवित्र जल,जल कलश भरून आणून श्री महर्षी व्यास मंदिराजवळील अति प्राचीन जागृत अशा महादेव मंदिरात जलाभिषेक केला जाणार आहे.
यामुळे संपूर्ण यावल शहरात अधिक मासाचा समारोप आणि श्रावण महिन्याचा शुभारंभ केला जाणार असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.