कळमसरे गाव एलआयसीकडून ‘विमा ग्राम’ म्हणून घोषित

0
7

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतर्फे कळमसरे गाव ‘विमा ग्राम’ म्हणून घोषित करण्यात आले. याबाबत शाखाधिकारी गोपाल सोलंकी, उपशाखाधिकारी सुमितकुमार, विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांना अमळनेर एलआयसीतर्फे ७५ हजार रुपयाचा धनादेश गावाच्या विकास कामासाठी देण्यात आला.

विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी या आर्थिक वर्षात गावातील ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात विमा कवच देऊन सुरक्षित केले. त्याबद्दल बक्षीस म्हणून येथील ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी सोलंकी म्हणाले की, एलआयसी ही सामाजिक बांधिलकी जोपासते. म्हणूनच अमळनेर येथील गतिमंद आणि मूकबधीर विद्यालयाला मुलांना ये-जा करण्यासाठी सुमारे २५ लाखांची गाडी भेट दिली आहे.
उपशाखाधिकारी सुमित कुमार यांनी कळमसरे ग्राम विमा ग्राम घोषित करण्यामागे विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी मेहनत घेत ग्रामस्थांना सुरक्षित असे विमा कवच देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी विम्याचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्‍वर पाटील, पाडळसरे येथील रवींद्र पाटील, सचिन पाटील, अशोक चौधरी, अरुण चौधरी, झूलाल चौधरी, धमेंद्र राजपूत, नगराज चौधरी, रामलाल पाटील, सीताराम चौधरी, सुनील पाटील, योगेंद्र चौधरी, योगेश पाटील, नारायण पाटील, शरद चौधरी, प्रदीप पाटील, किशोर चौधरी, पोलीस पाटील गोपाल पाटील, स्वप्नील माळी, गजानन पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, मधुकर पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here