परधाडे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रतिक महाजन

0
49

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील परधाडे येथे सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली. ग्रामसभेत सर्वानुमते परधाडे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रतीक महाजन यांची निवड करण्यात आली.

परधाडे गावातील प्रतीक महाजन हे पत्रकार असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. तंटामुक्ती समिती ही गावातील विविध वाद-विवाद आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष हे गावातील शिक्षित व्यक्ती म्हणून त्यांची निवड केली आहे. गावातील लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन, असे प्रतीक महाजन यांनी निवडीप्रसंगी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here