Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon ZP : जळगाव जि.प. : आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न लागला मार्गी
    जळगाव

    Jalgaon ZP : जळगाव जि.प. : आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न लागला मार्गी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 9, 2025Updated:May 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    समुपदेशनाने २१ आरोग्य सेवकांना पदोन्नती ; जि.प.च्या प्रशासनाचे कौतुक

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वतः समुपदेशन घेऊन शुक्रवारी, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारीही उपस्थित होते. सीईओ मिनल करनवाल यांच्या सक्रिय भूमिकेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ‘ही दिवाळी नवीन घरी’ अशा महत्त्वाकांक्षी योजनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लावल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय प्रलंबित असल्याने रखडला होता. अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर अशा प्रलंबित पदोन्नत्या आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला होता. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत पदोन्नतीचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले होते.

    आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देऊन पदस्थापना

    गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात सीईओ मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया पार पडली. त्यात २१ आरोग्य सेवकांना त्यांच्या मागणीनुसार रिक्त असणाऱ्या ठिकाणी आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.