साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे १० वी, १२वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षेत उत्तीर्ण ५०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजुमामा भोळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महापौर जयश्री महाजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले होते.
व्यासपीठावर जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष महेश चौधरी, सचिव नारायण चौधरी, नगरसेविका मंगला चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, प्रल्हाद चौधरी, वामन चौधरी, अनिल चौधरी, भोलाआप्पा चौधरी, ॲड. महेंद्र चौधरी, अशोक चौधरी, शांताराम चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेशनाना चौधरी, सुरेशआण्णा चौधरी, संतोष चौधरी, विजय चौधरी, सतीश चौधरी, चंद्रकांत चौधरी, पुंडलिक जावरे, डी. ओ. चौधरी, दत्तात्रय चौधरी, बी. एम. चौधरी, गणेश चौधरी, प्रताप चौधरी, एकनाथ चौधरी, लोटन चौधरी, पवार गुरुजी, बाळासाहेब चौधरी आदिंची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. १० वी, १२ वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षेत उत्तीर्ण ५०० विद्यार्थ्यांना भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व मान्यवरांच्या हस्ते शालेय बॅग, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाची वाटचाल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विजय चौधरी, महापौर जयश्री महाजन, आ. राजू मामा भोळे, शांताराम चौधरी, कु.अमृता चौधरी, रुचिता चौधरी, तनय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
तेली समाज भूषण तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मान्यवरांच्या हस्ते समाज बांधवांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महेश चौधरी यांनी तर सूत्रसंचालन सचिव नारायण चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दुर्गेश चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, मनोज चौधरी, सुनील चौधरी, डॉ. विनोद चौधरी, पांडुरंग चौधरी यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.