माजी पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार समर्थकांसह शिंदे शिवसेनेच्या गटात
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
येथील आमदारांच्या निवासी शिवालय शिवसेना कार्यालयात रविवारी भाजपला धक्का देत कार्यकर्त्यांसह पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांनी शिवसेनेत घर वापसी केली. त्यांच्यासमवेत कोकडी तांडा, वडगाव जोगे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे, भोकरी, सावखेडा परिसरातील कार्यकर्ते विविध क्षेत्रातील, पक्षातील आणि तांडातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
त्यात नंजय मोहन राठोड, भूमेंद्रसिंग भिमसिंग राठोड, सचिन टेकचंद राठोड, दिनकर जगन चव्हाण, बालचंद हरी चव्हाण, विजय सोनसिंग राठोड, सोनसिंग काळू राठोड, निखिल टेकचंद राठोड, विकास अण्णा जाधव, राहुल आलासिंग राठोड, प्रशांत प्रेमसिंग राठोड, अनिल मखराम राठोड, विनोद मोरसिंग राठोड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आ. किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा निर्धार करून मूळ शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल आदी उपस्थित होते.